माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा उभारण्याबाबत पालिका उदासिन असल्याबद्दल आमदार संजय केळकर यांची नाराजी

राष्ट्र उभारणीसाठी संरक्षक यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा बसवण्यास महापालिकेला रस नसल्याबद्दल आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जात आहे. ठाणे महापालिकेतर्फे महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जाते. शिवाजी उद्यानामध्ये महात्मा गांधी यांचा अर्धपुतळा आहे. या पुतळ्याजवळ लाल बहाद्दूर शास्त्री यांची प्रतिमा ठेवून शास्त्री यांचीही जयंती साजरी केली जाते. आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा बसवावा अशी मागणी २ वर्षापूर्वी केली होती. त्याचा पाठपुरावाही त्यांनी केला. वेळोवेळी संबंधित अधिका-यांशी बैठकाही झाल्या. चर्चाही झाली. पालिका आयुक्तांनीही याबाबत ठोस आश्वासन दिलं. पण त्यापुढे मात्र काही झालं नाही. आजही लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावरूनच आयुक्त आणि पालिका अधिकारी यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसून प्रशासन याबाबत उदासिन असल्याबद्दल संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment

%d bloggers like this: