महिंद्र ॲण्ड महिंद्रचा शहरात परिपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेशी सामंजस्य करार

महिंद्र ॲण्ड महिंद्रनं ठाणे शहरात परिपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार ठाण्यामध्ये सर्वत्र परिपूर्ण आणि प्रदूषण विरहित वाहतूक सुविधा देण्यासाठी महिंद्रची इलेक्ट्रीक वाहनं वापरली जाणार आहेत. या वाहनांमध्ये नुकतीच दाखल झालेली ट्रिओ ही इलेक्ट्रीक थ्री व्हीलर आणि ई-सुप्रो ही मास पॅसेंजर कॅरियर समाविष्ट करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या सुरूवातीच्या टप्प्यात महिंद्र १०० इलेक्ट्रीक वाहनं देणार आहे आणि ही भागीदारी ५ वर्ष कालावधीसाठी असेल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. या सामंजस्य करारावर महापालिकेतर्फे आयुक्त संजीव जयस्वाल तर महिंद्र ॲण्ड महिंद्रतर्फे प्रकल्प अधिकारी कन्नन चक्रवर्ती यांनी स्वाक्ष-या केल्या. या उपक्रमांतर्गत नागरिकांना या वाहनांचा लाभ घेण्याची सुविधा बुकींगद्वारे दिली जाणार आहे. यासाठी अनुकुल असणारी यंत्रणा पुरवण्याकरिता आणि चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता महापालिका पाठिंबा देणार आहे. ठाणे महापालिका इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी महिंद्रनं प्रस्तावित केलेल्या चार्जिंग सुविधा ठिकाणांपासून जवळ पार्कींग सुविधाही उपलब्ध करणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी वीजेचे दर कमी असावेत यासाठी महापालिका पॉवर युटीलिटी कंपन्या आणि अन्य भागीदारांशी समन्वय साधणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: