महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं कृतज्ञतेची आणि सन्मानाची दिवाळी साजरी

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्यामुळं दिवाळीच्या सणात एकमेकांना शुभेच्छा आणि मिष्ठान्न भेट देण्याची परंपरा आहे. मात्र हातावर पोट असणा-या कचरा वेचकांसाठी सर्वच दिवस सारखे असतात. अशा वंचित आणि शोषित कचरा वेचकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं कृतज्ञतेची आणि सन्मानाची दिवाळी साजरी करण्यात आली. पालिका आयुक्तांनी घेतलेल्या कामगार हिताच्या निर्णयाचा जल्लोष साजरा करताना घनकचरा विभागानं १७० कचरा वेचक महिलांना मिठाई वाटप केल्यानं या कष्टक-यांनीही दिवाळी अनुभवली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं सामाजिक बांधिलकीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सीपी तलाव येथे एका स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. १७० कचरा वेचक महिलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं. घनकचरा व्यवस्थापनानं अशाप्रकारे प्रथमच सन्मानित केल्यानं या कचरा वेचकांना आपणही पालिकेच्या व्यवस्थापनातील महत्वाचे घटक असल्याची जाणीव झाली. घनकचरा व्यवस्थापनाचे घटक असलेल्या ठेकेदारांनाही घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासह शोषित कचरा वेचकांना शुभेच्छा दिल्या. तर त्याला प्रतिसाद म्हणून या कचरा वेचकांनीही भेट स्वीकारून कृतज्ञतेनं दुजोरा दिला. ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनानं प्रथमच अशाप्रकारे कचरा वेचकांसाठी दिवाळी साजरी करून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जपली.

Leave a Comment

%d bloggers like this: