भारतीय जनता पक्षाचे धनंजय कुलकर्णी यांना शस्त्र साठा ठेवल्याप्रकरणी अटक

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले धनंजय कुलकर्णी यांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेनं शस्त्र साठा ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. डोंबिवलीतील अरिहंत इमारतीत धनंजय कुलकर्णी यांचं तपस्या फॅशन हाऊस आहे. या फॅशन हाऊस मधून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं १७० प्राणघातक शस्त्रं जप्त केली आहेत. हा शस्त्र साठा २ लाखांचा असल्याचं सांगितलं जातं. धनंजय कुलकर्णी हा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष असून न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. हा साठा विक्रीसाठी आणला होता अशी माहिती कुलकर्णीनं पोलीसांना दिली आहे. मात्र हा साठा कुठून आणला आणि तो कोण विकत घेणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: