ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर बार बार देखो हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ब्रह्मांड संगीत कट्टा म्हणजे ब्रह्मांड कट्ट्यानं सुरू केलेली गाण्यांची मैफल. या संगीत कट्ट्यावर उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करण्याला संधी दिली जाते. या कार्यक्रमाची सुरूवात सावनकुमार यांनी चलो बुलावा आया है हे गाणं सादर करून केली. आओ हुजूर हमको सितारों में ले चलो हे गाणं अंजली आजगावकर यांनी सादर केलं. मेरे सपनों की राणी कब आयेगी तू, हे गाणं कुंदन धुरी तर तूने ओ रंगीले कैसा जादू किया हे गाणं स्नेहा आंदुर्लेकर यांनी सादर केलं. मंगेश भोईर यांनी गालावर खळी, निलम भोगटे यांनी बाग मे कली, पान खाये सैय्या हमार आणि जाने कहाँ मेरा जिगर गया जी, निलेश महाडीक यांनी सामने ये कौन आया दिल में हुई हलचल तर एक मैं और एक तू दोनो मिले इस तरह हे चंद्रशेखर शिंदे आणि शीतल भोपरकर यांनी सादर केलं. अशाप्रकारे एकापेक्षा एक गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. व्हाईस ऑफ रफी म्हणून ओळख असलेल्या शैलेंद्र जाधव यांनी शिर्डीवाले साईबाबा आणि तुम जो मिल गये ही दोन गीतं सादर करून या मैफलीत चार चाँद लावले.