बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी बाबासाहेबांचं स्मारक होणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी हरकत नाही पण बाबासाहेबांचं स्मारक होणारच अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६१ वा वर्धापन दिन ठाण्यात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं आयोजित मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. राज्यात रोज नवीन वाद उकरण्याचे काम काही लोकं करत आहेत. सध्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद सुरू करण्यात आला आहे. मात्र राज्यानं तयार केलेल्या आराखड्यामध्ये तसूभरही बदल केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पाया पडून सांगतो पण बाबासाहेबांबद्दल कुणीही वाद निर्माण करू नये असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्री पद मिळणार असून सत्तेमधला खरा वाटा त्यांना दिला जाणार आहे. तसंच येत्या दोन-तीन दिवसात महात्मा फुले मंडळाला राज्यमंत्री दर्जा दिला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राहुल गांधी पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. राफेल-राहुल, राफेल-राहुल असे बोलत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. इंधनाच्या वाढत्या दरावर जनता नाराज असून लवकरच जीएसटी अंतर्गत केंद्र सरकारचा विचार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही जणू जुळे भावा झाले असल्याची हास्यास्पद प्रतिक्रिया आठवले यांनी यावेळी बोलताना दिली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: