बंदी असलेल्या ट्रॅमॅडॉलचा साठा बाळगण्याप्रकरणी एका चौकडीला अटक

बंदी असलेल्या ट्रॅमॅडॉलचा साठा बाळगण्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं एका चौकडीला अटक केलं आहे. ट्रॅमॅडॉलला इसिस ड्रग म्हणून ओळखलं जातं. हे औषध पेनकिलर असून इस्लामिक स्टेटसाठी लढणारे याचा वापर करतात म्हणून त्याला इसिस ड्रग म्हणून ओळखलं जातं. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी ठाण्यातील चौघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या चौकशीनंतर ट्रॅमॅडॉलचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला. ट्रॅमॅडॉल या औषधावर बंदी असून या औषधाचं स्मगलिंग होत असल्याच्या आरोपानंतर यावर बंदी घालण्यात आली होती. या औषधाचा इसिसला पुरवठा केला जात असल्याचं सांगितलं जातं. पोलीसांनी या औषधाच्या २० हजार स्ट्रीप्स जप्त केल्या असून त्याची किंमत ५ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: