ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट २८ सप्टेंबरला बंद

ऑनलाईन औषध विक्री आणि ई-फार्मसींना भारतात कार्य करण्याच्या दिलेल्या मुभेच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्टनी २८ सप्टेंबरला बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे केमिस्टच्या व्यवसायावर गदा आली असतानाच अशाप्रकारे औषध खरेदीमुळं रूग्णाच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो. तेव्हा या ऑनलाईन विक्रीला सरकारनं आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टनं दिला आहे. औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आणणारी ऑनलाईन औषध विक्री रूग्णांच्याही जीवावर बेतू शकते. त्यामुळं केमिस्ट लोकांचा या औषध विक्रीला विरोध आहे. गर्भपातासाठी लागणारी एमटीपी किटस् तर नशेसाठी वापरली जाणारी सिल्डेनाफील, कोडेन, कोरेक्स औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्यामुळं नशेची प्रवृत्ती वाढत आहे. विना प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन मिळणा-या औषधांमुळे रूग्णाचे आरोग्य आणि औषधांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसंच ग्रामीण भागात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा होण्याबरोबरच लाखो औषध विक्रेते आणि कर्मचा-यांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती संघटनेनं व्यक्त केली आहे. ठाण्यातील केमिस्टही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading