पोलीस वसाहतीतून पोलिसाच्या पत्नीची दुचाकी लांबवली

ठाण्यात दुचाकी चोरांची मजल आता थेट पोलिसांच्या घरापर्यंत पोहचली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक यांच्या पत्नीची दुचाकी ते राहत असलेल्या नवीन पोलीस लाईन इमारतीतून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार 12 ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस नाईक नितीन कामठे यांच्या पत्नी मानसी या गृहिणी आहेत. कामठे कुटूंब गेली 11 वर्षांपासून कोर्ट नाक्यावरील नवीन पोलीस लाईन इमारत क्रमांक तीनमध्ये वास्तव्यास आहेत. 12 ऑक्टोबरला त्यांची इमारतीखाली पार्क केलेली 55 हजार रूपये किमतीची दुचाकी दुपारी दीड ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी पळवली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: