पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना धक्काबुक्की आणि मारहाण

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली.

राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे खासदार असून काल सकाळी ९ वाजता हा प्रकार घडला. राजेंद्र गावित हे मीरारोड येथील जॉगर्स पार्कमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते. त्यावेळी जॉगर्स पार्कच्या सुरक्षा रक्षकाशी ८ ते ९ जणांचा वाद सुरू होता. हा वाद पाहून गावित वाद सोडवण्यासाठी गेले. या ८ ते ९ माणसांना जॉगर्स पार्कच्या गवतावरून बूट घालून चालायचं होतं. पण त्याला सुरक्षा रक्षकानं विरोध केल्यामुळं त्यांच्यात आणि सुरक्षा रक्षकामध्ये वादावादी सुरू होती. यावेळी राजेंद्र गावित यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या ८ ते ९ लोकांनी राजेंद्र गावित यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पोलीसांनी वेळीच धाव घेऊन मारहाण करणा-या कीर्ती शेट्टी, राजेश विश्वनाथ शेट्टी, नवीन विठठल शेट्टी, सुकेश शेट्टी आणि शिवराम शेट्टी या ५ जणांना अटक केली.

Leave a Comment

%d bloggers like this: