ठाण्यामध्ये गेले काही दिवस दुचाकी जाळण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या आठवड्यात पाचपाखाडी परिसरात ९ दुचाकी जाळल्याची घटना घडली असतानाच लोकमान्य नगरमध्येही एक दुचाकी जाळण्यात आली होती. आज पहाटेच्या सुमारास पातलीपाड्यामध्ये जाळीच्या समोर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या तीन गाड्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुचाकी जाळण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळं दुचाकी धारकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
