दीड लाखाहून अधिक दुबार मतदार नोंदणी कमी करण्याची शिवसेनेची मागणी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील दीड लाखाहून अधिक मतदारांची नावं दुबार नोंदवली गेली असून ती दुबार नोंदणी झालेली नावं तातडीनं कमी करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं कोकण विभागीय आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या दुबार नोंदणी झालेल्या मतदारांच्या नावाचा अहवाल शिवसेनेतर्फे कोकण विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४१ हजार ७११, बेलापूरमध्ये ३१ हजार ४५९, कोपरी-पाचपाखाडीत २१ हजार, मीरा-भाईंदरमध्ये १० हजार ५५८, ओवळा-माजिवडा मध्ये ३३ हजार ६१ तर ठाणे विधानसभा मतदारसंघात १८ हजार ९७९ मतदारांची नावं दोनदा अथवा तीनदा नोंदवण्यात आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. दुबार नोंदणी झालेल्या नावांमुळे बोगस मतदारांना मोठी संधी असून ही नावं तातडीनं कमी करावीत अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: