डोंबिवली ते तळोजा तसंच मीरारोड ते वसई अशा नवीन मेट्रो मार्गाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन नवीन मेट्रो मार्गांची घोषणा केली आहे. कल्याण येथे पंतप्रधानांच्या हस्ते भिवंडी- कल्याण आणि दहीसर-मीरारोड या मेट्रोच्या मार्गाचं भूमीपूजन झालं त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या नवीन मार्गाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्री जागेवर बसले होते. पण परत पंतप्रधानांशी चर्चा करून त्यांनी ही घोषणा केली. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली, तळोजा मार्गाची मागणी केली असल्याचं सांगत डोंबिवली ते तळोजा आणि दहीसर- मीरारोड ही मेट्रो वसई पर्यंत पुढे वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली.

Leave a Comment

%d bloggers like this: