ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचे लोण सुरूच असून महागिरी कोळीवाड्यात तीन गाड्या आगीत भस्मसात

ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचे लोण सुरूच असून महागिरी कोळीवाड्यात तीन गाड्या आगीत भस्मसात झाल्या. महागिरी कोळीवाड्यातील हवा मंझिल येथे या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. अब्बास कुंभार यांची ॲक्टीव्हा आणि होंडा युनिकॉन तर महम्मद कुंभार यांची होंडा ॲक्टीव्हा या आगीत भस्मसात झाली. ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी या तिन्ही दुचाकी मात्र भस्मसात झाल्या आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: