ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचं लोण सुरूच असून आज पहाटे ४ रिक्षा आणि ५ दुचाकी जळून भस्मसात झाल्या. गेल्या महिन्यात जवळपास तीनदा विविध ठिकाणी दुचाकी जाळण्याचे प्रकार घडले होते. ठाणे पोलीसांनी याप्रकरणी तिघांना अटकही केली होती. पण अद्यापही हे प्रकार सुरूच आहेत. गावदेवी मैदानाजवळील गावदेवी बस थांब्याच्या इथे पहाटे ३ च्या सुमारास बजाज पल्सर ही दुचाकी आगीत भस्मसात झाली तर वागळे इस्टेट बस डेपोच्या समोर पहाटे तीनच्याच सुमारास ४ रिक्षा आणि ४ दुचाक्या आगीत भस्म झाल्या. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Image-2019-01-14-at-7.57.54-AM.jpeg)