ठाणे शहराचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यासाठी ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी म्हणजे 14 नोव्हेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार 15 नोव्हेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर इत्यादी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसरात बुधवार रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
