ठाणे रेल्वे स्थानकातील दोन पूलांची दुरूस्ती होणार

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन पूलांची दुरूस्ती होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात १९७२ मध्ये हे दोन पूल बांधण्यात आले होते. कल्याण आणि मुंबई असे दोन्ही दिशेला असलेले हे पूल आज ४७ वर्षानंतरही वापरात आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात रोज जवळपास ७ लाख प्रवाशांची ये-जा असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता या स्थानकामध्ये काही पूल बांधण्यात आले आहेत पण तरीही हे जुने पूलही वापरात आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी अचानक ठाणे रेल्वे स्थानकाचा दौरा केला त्यावेळी या पूलांवरील गर्दी वाढली की पूल हलतो असं त्यांच्या लक्षात आलं. या पूलांची डागडुजी वेळीच न झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो हे त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आणि पूलाची दुरूस्ती करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. रेल्वे प्रशासनानं या पाठपुराव्याची दखल घेत या दोन्ही पूलांच्या डागडुजीस मंजुरी दिली असून खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या पूलाच्या दुरूस्तीचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Comment

%d bloggers like this: