ठाणे महापालिकेतील नितीन आपटे कार्यालयीन अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त

ठाणे महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागातील नितीन आपटे कार्यालयीन अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले.महापौर मिनाक्षी शिंदे यांनी त्यांना शाल, स्मृतीचिन्हं देऊन त्यांचा सन्मान केला. नितीन आपटे यांची महापालिकेत ३९ वर्ष ९ महिने सेवा झाली. ठाणे महापालिकेत ते लिपीक या पदावर रूजू झाले आणि कार्यालयीन अधिक्षक या पदापर्यंत पोहचले. १९८६ ते २०१२ पर्यंत ते निवडणूक विभागात कार्यरत होते. विहीत वयोमानानुसार ते पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. सेवानिवृत्त होताना पालिकेतील त्यांच्या सर्व सहका-यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपटे यांच्या पत्नी निता आपटे यांना उपखाते प्रमुख पदावरून खाते प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांचंही यावेळी अभिनंदन करण्यात आलं.

Leave a Comment

%d bloggers like this: