ठाणे महापालिकेच्या वतीनं उद्या जनजागृतीपर दुचाकी रॅलीचं आयोजन

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्वच्छता मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होण्याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीनं उद्या सकाळी एका जनजागृतीपर दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रहेजा गार्डन ठाणे क्लब येथून महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या रॅलीची सुरूवात होणार आहे. ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नागरिकांमध्येही व्यापक प्रमाणात जागृती होण्याकरिता या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दुचाकी रॅलीत इंडियन मोटरसायकल या कंपनीची चिफ डार्क हाऊस ही बाईक विशेष आकर्षण असणार आहे. या रॅलीत फास्टेस्ट बाईक रायडर नितीन कोळी आणि शिल्पा बालकृष्णनही सहभागी होणार आहेत. तीन हात नाका, हरिनिवास, ओपन हाऊस, ठाणे महापालिका मुख्यालय, अल्मेडा रोड, गजानन महाराज मंदिर, तलावपाळी, स्टेशन रोड, जांभळी नाका, टेंभीनाका, उथळसर प्रभाग समिती, कॅसल मिल, कापुरबावडी जंक्शन, पोखरण रोड नंबर २, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा चौक, हिरानंदानी, कोलशेत रोड मार्गे बाळकूम अग्निशमन केंद्र येथे ही रॅली विसर्जित होणार आहे. तरी या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: