ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली वातानुकुलित उपनगरीय सेवा सुरू झाली आहे. काल रेल्वे राज्यमंत्र्यांनी तिचा शुभारंभ केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये या रेल्वेचं स्वागत केलं. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली वातानुकुलित रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. आता ही रेल्वे सेवा सुरू झाली असून या रेल्वेचं सारथ्य करण्याचा मान मनिषा म्हस्के या महिलेला मिळाला. त्याचप्रमाणे या रेल्वेचा गार्डही श्वेता घोणे या महिलाच आहेत. या रेल्वेच्या रोज १६ फे-या होणार आहेत. पहिल्या दिवशी या वातानुकुलित रेल्वे सेवेचा १०० प्रवाशांनी तिकीट काढून प्रवासाचा लाभ घेतला. मात्र पहिल्या गाडीत गर्दी ओसंडून वाहत होती.