कळवा, खारेगाव आणि शीळ परिसरातील वीज वितरणाचं टोरंट कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शनिवारी कळवा, खारेगाव आणि शीळ परिसरात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे. आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पारसिक नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुभाष भोईर आणि या भागातील ४७ नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध संघटना सहभागी होणार आहेत. तर मुंब्रा येथे २१ जानेवारीपासून विविध संघटना बेमुदत उपोषण करणार आहेत. कळवा, मुंब्रा, दिवा आणि परिसरातील वीज वितरणाचं खाजगीकरण करण्यात आलं असून २६ जानेवारी पासून टोरंट या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. टोरंट कंपनीच्या विरोधातील आंदोलनात राजकीय जोडे बाजूला ठेवून सहभागी व्हावं असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं आहे.
