जितेंद्र आव्हाड यांनी केली कळवा रेल्वे स्थानकाची पाहणी

कळवा रेल्वे स्थानकात कारशेडमधून येणा-या लोकल करता होम प्लॅटफॉर्म उभारावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अमोल कदम यांनी रेल्वे बोर्डाकडे केली असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कळवा रेल्वे स्थानकाची त्यासाठी पाहणी केली. कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांना गर्दीच्या वेळी गाडीत चढताही येत नसल्यानं प्रवासी कारशेडमधून निघणा-या गाड्या रूळावर उभे राहून पकडतात. कळवा रेल्वे स्थानकाचा विस्तार होत असून कळवा रेल्वे स्थानकातून ४ मार्ग जात आहेत. यामध्ये स्थानकातील २ क्रमांकाच्या फलाटावरील तिकिट बुकींग कार्यालयं हटवली जाणार आहेत. यामुळं फलाट क्रमांक १ मधील पादचारी पूलाचा भाग पश्चिमेला कारशेडच्या जागी उतरवण्यात येणार आहे. यामुळं पादचारी पूलापासून प्रवाशांना कारशेड गेटच्या बाजूनं ये-जा करावी लागणार आहे. यासाठी कारशेडचं गेट आत घेतलं जाणार आहे. त्यामुळं कळवा कारशेडमधून निघणा-या गाडीकरता फलाट बांधता येऊ शकतो. याबाबत रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अमोल कदम यांनी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव दाखल केला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कळवा रेल्वे स्थानकाची पाहणी करून रेल्वेच्या विकास कामांचा आढावा घेतला आणि होम प्लॅटफॉर्मसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: