चष्म्याच्या दुकानदाराची 30 हजारांची फसवणूक करून भामटा पसार

ठाण्यात प्रख्यात बँकेला दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीच्या बतावणीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. यातील भामट्याने चष्म्याच्या दुकानदाराची 30 हजारांची फसवणूक करून पसार झाल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली मात्र तक्रार दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आली. रामचंद्रनगर वैतीवाडी येथे आनंदकुमार गुप्ता यांचे चष्म्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे अक्षय मदने हा तरुण काम करतो. 24 सप्टेंबर रोजी सकाळी दुकानात आलेल्या फोनवर बोलणाऱ्या महिलेने डॉ.कोरडे बोलत असल्याची बतावणी करून कॉन्टॅक्ट लेन्स घेवून येण्यास सांगितले. त्याचबरोबर त्या महिलेने सुटे 30 हजार पाठवून देण्यास सांगितले. त्यानुसार गुप्ता यांनी मदने यांच्याकरवी रक्कम आणि अडीच हजारांच्या लेन्स महिलेने सांगितलेल्या आकांक्षा हॉस्पिटल येथे पाठवल्या. मात्र सोसायटीच्या खाली एका भामट्याने आपणच डॉ.कोरडे यांचा मुलगा असल्याचे सांगून 30 हजार घेतले आणि चौथ्या मजल्यावरील घरात आपली डॉक्टर आई आहे. तिला लेन्स द्या आणि सर्व रक्कम घ्या असे सांगून पोबारा केला. चौथ्या मजल्यावर गेल्यावर तिथे कुणीही डॉ. कोरडे राहत नसल्याचे तेथील रहिवाश्यांनी सांगताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading