चकमक फेम पोलीस उपनिरिक्षक रविंद्र आंग्रे यांनी राफेल भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात धरला आहे. पोलीस दलातील आपल्या कार्यकाळात ५४ पेक्षा जास्त गुन्हेगारांचे एन्काऊंटर करणा-या माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा हात धरला आहे. राफेल मधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. रविंद्र आंग्रे भारतीय जनता पक्षाचे पालघर विभागाचे महासचिव होते. आता त्यांची काँग्रेसनं सचिव पदावर नियुक्त केली आहे.
