मुख्य वन संरक्षकांच्या दालनात आंदोलन करून त्यांच्यावर राख, कुंड्या फेकणा-या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिका-यांवर ३५३ खाली कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांनी केली आहे. मुख्य वन संरक्षकांच्या दालनात झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल निष्काळजीपणा दाखवणा-या वनखात्यातील अधिका-यांविरोधात आंदोलन करताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांच्या अंगावर राख, माती तसंच शाई फेकली. याप्रकरणी पोलीस खरोखर निष्पक्ष असतील तर घरी पालकमंत्री असल्यामुळे हम करे सो कायदा ही भावना जर खासदारांची झाली असेल तर पोलीसांनी या सर्वांवर ३५३ अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि अशी कारवाई झाली नाही तर इथले पोलीस शिवसेनेच्या दबावाखाली कुठलीच कारवाई करू शकत नाही हे पुन्हा एकदा सिध्द होईल असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/11/anand-paranjape.jpg)