खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात स्वखर्चाने दिली रुग्णवाहिका

रेल्वे मार्गावर होणा-या अपघातात प्रवाशांना तातडीनं उपचार मिळावेत म्हणून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चानं दिवा रेल्वे स्थानकासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. अलिकडेच रूग्णवाहिका न मिळाल्यामुळं एका जखमी झालेल्या प्रवाशाला उपनगरीय गाडीतून न्यावं लागलं होतं. त्यात वेळ लागल्यामुळं या प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी ही रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. प्रशासकीय बाबींमुळे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, रूग्णवाहिका यांना विलंब होत असल्यामुळं खासदार शिंदे यांनी तातडीची बाब म्हणून स्वखर्चाने प्रवाशांच्या सेवेसाठी रूग्णवाहिका दिली आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष असावेत तसंच २४ तास रूग्णवाहिका उपलब्ध असावी यासाठी खासदार श्रीकांत शिंदे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. त्यातूनच कल्याण, डोंबिवली, मुंब्रा या स्थानकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू झाले आहेत. दिवा येथील प्रवाशांची वाढती संख्या आणि एकूणच रेल्वेचा लाल फीतीचा कारभार बघून दिवा रेल्वे स्थानकासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला होता. काल या रूग्णवाहिकेचं त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: