कोकण कला अकादमी आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेली १२ वर्ष सातत्यानं कोकण विभागीय स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यावर्षी २ ते ९ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. सर्वोत्कृष्ट एकांकिका, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्य, प्रकाश योजना अशा विविध विभागात ३ लाख रूपयांची रोख पारितोषिकं, स्मृतीचिन्हं आणि प्रमाणपत्रं विजेत्यांना दिलं जाणार आहे. कोकणातील कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेची प्राथमिक फेरी एकाच दिवशी होणार असून प्राथमिक फेरीतून निवडलेल्या एकांकिकेची अंतिम फेरी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
