कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. गोपाळ लांडगे हे ठाणे महापालिकेचे अनेक वर्ष सदस्य होते. त्यांनी स्थायी समितीचं सभापती पदही भुषवलं आहे. सध्या गोपाळ लांडगे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून काम करत असून त्यांची आता कोकण म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महापालिकेतील निवडणुकांच्या नियोजनात हातखंडा असलेल्या शिवसेनेच्या विलास जोशी यांची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. महापालिकेमध्ये होणा-या विविध निवडणुकांच्या मागे नगरसेवकांचं नियोजन कसं करायचं, निवडणुकांचे अर्ज दाखल करताना ते कसे योग्य पध्दतीनं दाखल होऊन अवैध ठरणार नाही यासाठी काम करणा-या विलास जोशी यांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचं सदस्यत्व मिळालं आहे.
