कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यामुळं कल्याण-डोंबिवली स्थानकाचा कायापालट होणार

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्यामुळं कल्याण-डोंबिवली स्थानकाचा कायापालट होणार आहे. ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळावा आणि अधिक उपनगरीय गाड्या सुरू करता याव्यात यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी ठाकुर्ली टर्मिनसला मंजुरी देतानाच कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा पर्याय पुढे आला होता. कल्याण स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गुडस् यार्डची पुनर्रचना करून लांब पल्ल्याच्या तसंच उपनगरीय गाड्यांसाठी त्यांचा वापर करण्याची चर्चा झाली होती. एमयुटीपी ३-ए अंतर्गत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. यामुळं उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन गाड्यांचा खोळंबा टळणार आहे. त्यामुळं रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या ९६१ कोटी रूपयांच्या या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्याचप्रमाणे डोंबिवली स्थानक आणि स्थानक परिसरावर येणारा प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी या स्थानकाचा पुनर्विकास करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली होती. एमयुटीपी ३-ए अंतर्गत मंजूर झालेल्या १९ स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पात डोंबिवलीचाही समावेश झाल्यामुळं डोंबिवलीकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading