ठाणे महापालिकेची नागरी सुविधा केंद्र आणि कर वसुली कार्यालयं ३१ मार्च पर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. नागरिकांना ३१ मार्चच्या आधी मालमत्ता कर भरणं सुलभ होण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र आणि कर वसुली कार्यालयं ३१ मार्च पर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर, पाणी बीलं आणि इतर कर नागरिकांना वेळेत भरता यावेत यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालयं आणि उपप्रभाग कार्यालयं ३१ मार्च पर्यंत दुसरा आणि चौथा शनिवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी २१ मार्च ही धुळवडीची सुट्टी वगळून सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. तर सर्व रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत ही कार्यालयं सुरू राहणार आहेत. ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरही मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
