कन्याकुमारी एक्सप्रेस आता ठाण्यात थांबणार असल्यामुळं तिरूपतीच्या भक्तांची सोय होणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांमुळे सीएसटी ते कन्याकुमारी एक्सप्रेस आजपासून ठाण्यात थांबणार आहे. ही एक्सप्रेस गेली ४० वर्षे सुरू आहे. कन्याकुमारीवरून येताना या गाडीला पहाटे साडेतीन वाजता ठाण्यात थांबा आहे. पण मुंबईहून जाताना ठाण्यात थांबा नव्हता. हा थांबा मिळावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली होती. पियुष गोयल यांनी मुंबई-कन्याकुमारी एक्सप्रेसला ठाण्यात थांबा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून या गाडीला ठाण्यात थांबा देण्यात आला आहे. ही गाडी तिरूपती देवस्थानला थांबत असल्यानं तिरूपतीच्या भक्तांची यामुळं मोठी सोय होणार आहे.
