festival

ए. के. जोशी शाळेत प्राथमिक विभागाच्या मुलांची दिंडी

महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. या महासोहळ्याच्या सांप्रदाय परंपरेला अनुसरून दरवर्षी आनंदीबाई केशव जोशी या शाळेत दिंडी काढली जाते. यावर्षी प्राथमिक विभागाच्या चौथीतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात सादर केलेल्या दिंडीनं संपूर्ण शाळा ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरानं दुमदुमून गेली होती. वारी म्हणजे काय, ही प्रथा का आणि कशी चालू झाली याची माहिती देत स्वच्छता आणि स्वावलंबन यांचा कानमंत्र देत छोट्या वारक-यांनी दिंडीत टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि वारक-यांच्या वेषात माझे काम मीच करणार आणि स्वावलंबनाचा धडा गिरवणार हा सद्गुणाचा मंत्र दिला.

Comment here