उल्हासनगर स्थानकात वन रूपी क्लिनिकचे उद्घाटन

रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या वन रूपी क्लिनिकचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर स्थानकात झालं. कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण नंतर सुरू झालेला हा पाचवा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये ही क्लिनिक्स पूर्वीच सुरू झाली असून अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये येत्या आठवड्यात ही क्लिनिक लोकार्पण होणार आहेत. याबरोबरच दिवा आणि ठाकुर्ली येथील क्लिनिकचं कामही प्रगतीपथावर आहे. या क्लिनिकमध्ये अवघ्या एका रूपयात वैद्यकीय तपासणी तर सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचणी करून दिली जाणार आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यामुळे अनेकांचे प्राणही वाचले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: