आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ

ठाण्यातील आनंदनगर या झोपडपट्टीचा कायापालट केला जाईल आणि येथे होणारा गृहप्रकल्प पाहण्यास ठाण्याबाहेरून लोकं येतील अशी दर्जेदार घरं येथील नागरिकांना मिळतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ठाण्याच्या वेशीवर असलेला आनंदनगर येथील हा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला होता आता तो लवकरच मार्गी लागणार आहे. या प्रकल्पाचं काम दिलेल्या मुदतीपेक्षा लवकर होते हे सर्वसामान्यांना समजले पाहिजे याकरिता एसआरए च्या अधिका-यांनी या भागातील नागरिकांना सहकार्य करावं तर नफा कमी कमवा पण आपल्या मतदारांना चांगली आणि वेळेत घरं द्या असं आवाहनही पालकमंत्र्यांनी विकासकांना केलं.

Leave a Comment

%d bloggers like this: