अनधिकृत बांधकाम प्रकरणात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

अनधिकृत बांधकाम प्रकरणात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. ठाणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० अन्वये कारवाई करण्यासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. मात्र राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणात सत्ताधारी नगरसेवकांना अभय दिलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवून त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं. यासंदर्भात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. पालिका आयुक्तांना यासंदर्भात कारवाई करणारी अनेक निवेदनं देण्यात आली आहेत. न्यायालयानंही अशा नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही. त्यामुळं ज्यांच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत त्या सर्व नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी राष्ट्रवादीनं एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: