सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणा-या पोलीसांचेच फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं उघड झालं आहे. ऑनलाईन सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी धडपडणा-या पोलीसांनाच आता सायबर गुन्हेगारीचा त्रास होत असल्याचं दिसत आहे. शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी आणि नामांकीत व्यक्तींची फेसबुक खाती हॅक झाल्याचं उघड झालं आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवीन नवीन कल्पना शोधून काढत आहेत. एखाद्याचं फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याच्या फोटोच्या आधारे त्याच्याच मित्रांकडून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. पण आता या गुन्हेगारांनी पोलीस अधिका-यांचीच खाती हॅक केली आहेत. ठाण्यातील काही वकील तसंच नामांकीत व्यक्तींची खातीही हॅक केली गेली आहेत. मात्र यामागे असणा-या व्यक्तींचा तपास लागू शकलेला नाही. कुठेही पासवर्ड देताना शक्यतो सोपा पासवर्ड देऊ नये, पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, चिन्ह यांचा वापर केल्यास खाते लवकर हॅक होऊ शकत नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन पोलीसांकडून केलं जात आहे.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2021/01/hack.jpg)