जलवाहिनीच्या गळतीमुळे ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

ठाणे शहरात होणार्या स्टेम पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहाड येथे रॉ पाईपलाईन लिकेज/गळती झाल्यामुळे अत्यंत तातडीचे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे.
पण ही पाईपलाईन नदीच्या खाडीजवळ असून भूमिगत पाईपलाईन असल्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी 12 ते 14 तास आवश्यक आहे.

या कारणांमुळे स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत शहरास होणारा पाणी पुरवठा शनिवार दिनांक ०२ जानेवारी,२०२१ रोजी पूर्व पदावर येईपर्यंत कमी दाबाने होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading