श्री ठाणा वर्धमान स्थानकवासी जैनसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत डॉ. हितेश छाडवा आणि हिरेन शहा हे प्रचंड मतांनी निवडून आले. डॉ. हितेश छाडवा हे डॉक्टरी पेशाबरोबरच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. कोविड काळात डॉ. हितेश छाडवा यांनी अनेक रुग्णांना मोफत सेवा देण्याचे कार्य केले. तर हिरेन शहा हे सुद्धा सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात. व्यापारी समाजाचे ते अध्यक्ष असून त्यांनीही आपल्या कार्याने नावलौकिक प्राप्त केला आहे. डॉ. हितेश छाडवा आणि हिरेन शहा हे जैन समाजासाठी मोलाचे योगदान देत आहेत. जैन संघाच्या निवडणूकीत विजयी झाल्याबद्दल ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.