सोमवारी पहाटे सिंह राशीतील मघा नक्षत्रात लिओनीड उल्का वर्षाव पहायला मिळणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ईशान्य क्षितीजावर मघा नक्षत्रातून उल्का वर्षाव होताना दिसेल. यावर्षी आकाशात चंद्र प्रकाशाचा अडथळा येणार आहे. तरीही तासाला १० ते १५ उल्का पडताना दिसतील असं सोमण यांनी सांगितलं. पृथ्वी या दिवशी ५५ पी, टेम्पल टटल या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. दर ३३ वर्षांनी हा धूमकेतू पृथ्वीपाशी येत असतो. त्यामुळं दर ३३ वर्षांनी मोठा उल्का वर्षाव पहायला मिळतो असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.