महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सुमारे ११९ किलो प्लास्टिक जप्त करून १९ हजार ९००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण ११९ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून १९ हजार ९००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.