महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये २३७ किलो प्लास्टिक जप्त करून ६६ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेतंर्गत महापालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून २३७ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून ६६ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.