ठाण्यामध्ये दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव संपन्न झाला. बाळ गोपाळ मित्रमंडळ, नारळवाला चाळ आणि पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं यंदाही हिंदूहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या दहीहंडी महोत्सवाचं यंदाचं हे २८वं वर्ष होतं. या महोत्सवाला पॅरा ऑलिम्पिक गेम्स मधील सुवर्णपदक विजेता अशोक भोईर उपस्थित होता. या महोत्सवात १२ दिव्यांग शाळांतील ३७८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित गरजूंना वह्या, औषधं वाटप करण्यात आली. तसंच अवयव दानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी ९८ जणांनी अवयव दानाचे फॉर्म भरले अशी माहिती या दहीहंडी महोत्सवाचे आयोजक विलास ढमाले यांनी दिली.