आनंद भारती समाजाने १२१ व्या आनंद भारती महाराजांच्या पुण्यतिथी-चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत मिडीयम गटातील ऍब्ज जिमचा करण ठाकुर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी ठरला. ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत ५०पेक्षा जास्त स्पर्धकांना मागे टाकत करणने हे यश संपादन केले. स्पर्धेत स्पृहणीय कामगिरी करत ऍब्ज जिमने १७ गुणांसह सांघिक विजेतेपद मिळवले. स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या आर फिटनेस सेंटरने १३ गुण मिळवत उपविजेतेपद मिळवले.ऍब्ज जिमचा विवेक सिंग स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक ठरला.
शॉर्ट गटात गोरख भांडकोळी, राम लाड, विशाल देसाई , मिडीयम गटात करण ठाकुर, निलेश दवणे, रमेश तेमर, टॉल गटात जगन्नाथ जाधव, राजीव कार्डोझ तर सुपर टॉल गटात नंदलाल झा, भुषण पाटील, अभिषेक लोंढे हे विजेते ठरले.