जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला जाणार आहे. नौपाड्यातील सैनिकी मुलांच्या वसतीगृहात सकाळी ११ वाजता या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. २९ सप्टेंबर २०१६ ला भारतीय सैन्यानं पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खातमा केला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शासनानं शौर्यदिन साजरा करण्याचं निश्चित केलं आहे. त्यासाठी हा शौर्यदिन साजरा केला जाणार आहे.