गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याची ईवा मनोज हिने १६ वर्षा खालील मुलीच्या गटात हेक्झॉथलॉन स्पर्धेत नवीन विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले आहे. हेक्झॅथलॉन म्हणजे – १०० मी. धावणे, लांब उडी, गोळा फेक, उंच उडी, भाला फेक, २०० मी. धावणे एवढे प्रकार असतात. तिच्या गटात एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. आंतर शालेय राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्यांतील “ट्रॅक ॲन्ड फिल्ड मास्टर्स” क्लबच्या खेळाडूनी चमकदार कामगिरी केली. ईवा मनोजने चार सुवर्ण आणि एक कास्य पदकासह वैयक्तीक चॅम्पियनशिप पटकावली. पुण्यातील शिव छत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत ईवा मनोज हिने ४०० मी. धा, खांब उडी, १०० मी रिले ,उंच उडी – ब्रान्स पदकासह वैयक्तीक कामगिरीसह सर्वोकृष्ट धावपटू म्हणून गौरवण्यात आले होते. प्रेक्षा कोलते, ईशाना संतोष, श्रावणी घुडे, निकोल स्पेस्की आणि आहाना चक्रवर्ती या स्पर्धकांनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना दत्ता चव्हाण हे मार्गदर्शन करत आहेत. सर्व खेळाडुनी सुवर्ण, रौप्य, कास्य पदके जिंकून उत्तम कामगिरी केल्यामुळे सी.आय.एस. सीई. राष्ट्रीय स्तरावरील अथलेटिक्स स्पर्धेत ईवा मनोज, प्रेक्षा कोलते यांची एस.सी.एफ. आय. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.