मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीवत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून गेल्या गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून सर्वांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडणूक, विश्वासदर्शक ठराव अशा सर्व राजकीय बाबी पार पाडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाण्याला भेट दिली होती. त्यानंतर आज मंत्रालयात येऊन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे आदी कुटुंबिय उपस्थित होते.