मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर टँकरच्या अपघातात चालक किरकोळ जखमी

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर आज एका ऑईल टँकरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात या टँकरचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. सकाळच्या सुमारास राजकोटहून वाशीकडे जाताना टँकर चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळं हा टँकर रस्ता सोडून बाहेर गेला. यामध्ये या टँकरचा चालक रूपदेव चव्हाण हा किरकोळ जखमी झाला आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकानं रस्त्याबाहेर अर्धा लटकत असलेला टँकर जवळपास अडीच ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर पुन्हा रस्त्यावर आणण्यात यश मिळवलं.

Leave a Comment

%d bloggers like this: