रूणवाल गार्डन इस्टेटमधील परांची प्रकरणात दोघांना अटक

बाळकूम येथील रूणवाल गार्डन इस्टेटमधील परांची प्रकरणात जबाबदार असलेल्या दोघांना कापुरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. बाळकूम मधील रूणवाल गार्डन सिटीमधील रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची कोसळल्यामुळं अलिकडेच अपघात झाला होता. यामध्ये ७ कामगार जखमी झाले होते. संग्राम कुंभार आणि अजमल दुसान अशा दोघांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. कामगारांना सुरक्षा उपकरण न पुरवणं आणि निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. दादा नाना कुंभार कंपनीचे संग्राम कुंभार हे मालक असून अजमल दुसान हा त्यांचा सुपरवायझर होता. रंगकामासाठी परांची दोन वर्षापूर्वी उभारण्यात आली होती. परांचीसाठी वापरण्यात आलेले बांबू सैल झाले होते. कंपनीनं कोणतीही खातरजमा न करता अथवा कामगारांना सुरक्षा उपकरणं न पुरवता निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: