बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीचं नियमन

दिवाळी दरम्यान ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलीसांनी बाजारपेठे मध्ये वाहतुकीचं नियमन केलं आहे. वाहतुकीचं हे नियमन ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान लागू करण्यात आलं आहे. जांभळी नाक्याकडून बाजारपेठेमध्ये दुचाकी वगळून इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. खारकर आळीतून बाजारपेठेकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. महम्मद अली रोडने जांभळीनाका बाजूकडे येणा-या मार्गावर दुचाकी वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. दादोजी क्रीडा संकुलाकडून बाजारपेठेकडे येणा-या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. अशोक चित्रपटगृहाकडून नॅशनल इलेक्ट्रॉनिक दुकानाकडे जाणा-या मार्गावर दुचाकी वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. एकूणच बाजारपेठेकडे येणा-या सर्व मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाजारपेठेकडे येण्यासाठी अथवा बाजारपेठेतून जाण्यासाठी सर्व वाहनांनी अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक शाखेनं केलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: