परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिल्यानं महापालिका अधिकारी-कर्मचा-यांसोबतच परिवहन सेवेतील अधिकारी कर्मचा-यांनाही दिवाळीचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी पालिकेच्या नियमित वेतन श्रेणी आणि नियमित सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांना हा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. परिवहन सेवेतील आस्थापनेवरील एकूण २००९ अधिकारी, कर्मचारी तसेच सेव्वानिवृत आणि कुटुंब निवृत्त वेतन धारक ७९ अशा एकूण २०८८ पात्र कर्मचाऱ्यांना १५ हजार १०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचीही दिवाळी आनंदात जाणार आहे.
